Uncategorized

राज्यभरात२२११८ खोल्या,५५७०७ खाटांची सोय,प्रशासन सज्ज

कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . या खोल्यांमध्ये जवळपास 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. अशोक चव्हाण म्हणाले, “कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले […]

Read more
Uncategorized

ज्योतिरादित्य शिंदे यांचा राहुल गांधींना झटका,काँग्रेसला रामराम

भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर 19 आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही वेळापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. […]

Read more
महाराष्ट्र, राष्ट्रीय, Uncategorized

कोरोनामुळे शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द

मुंबई : करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शरद पवार यांचा नाशिक दौरा आणि कळवण तालुक्यातील शेतकरी मेळावा रद्द करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये करोनाचे चार संशयित आढळले होते. त्यांची तपासणी निगेटिव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्य़ात करोना व्हायरसचे चार संशयित […]

Read more
राष्ट्रीय, Uncategorized

मध्यप्रदेशात जोरदार राजकीय हालचाली, कमलनाथ संकटात

मध्य प्रदेशमधील राजकीय धुळवड चांगलीच रंगात आली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर राजकीय संकट ओढावल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी आपले सरकार वाचवण्यासाठी मंत्रिमंडळास राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंत्रिमंडळातील २० मंत्र्यांनी कमलनाथ यांना आपला राजीनामा सादर केला आहे. शिवाय कमलनाथ यांना मंत्रिमंडळ पुनर्चनेसाठी मंत्र्यांनी अधिकारही दिले आहेत. कमलनाथ यांच्याविरोधात ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडाचा झेंडा उभारल्याचे दिसत […]

Read more
राष्ट्रीय, Uncategorized

पुण्यात आढळले करोनाचे दोन रूग्ण; उपचार सुरू

पुण्यात करोनाचे दोन रूग्ण आढळले असून त्यांच्यावर नायडू रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. संबंधित रूग्णांना नायडू रूग्णालयातील करोना कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांनी २० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान दुबईचा दौरा केला होता. भारतात परतल्यानंतर त्याच्या सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणं दिसून आली. त्यामुळे ते सोमवारी नायडू रूग्णालायात दाखल झाले. त्यानंतर केलेल्या तपासादरम्यान […]

Read more
महाराष्ट्र

इंदुरीकरांच्या समर्थनासाठी बाभळीच्या काट्यावर झोपले भगवान महाराज

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत उठलेल्या वादळात त्यांच्या समर्थनांत बीड जवळील तांदळवाडी येथील महादेव मंदिरातील भगवान महाराज यांनी चक्क बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना सुरू केली. उद्यापर्यंत प्रशासनाला यांची कसलीच माहिती नसल्याचे सुत्रांनी सांगितले. बीड पासून 22 किलोमीटर अंतरावरील तांदळवाडी गावातील महादेव मंदिरात, गतवर्षी याच महाराजांनी पाऊस पडू दे म्हणून झाडावर स्वतःला टांगून घेऊन साधना केली […]

Read more
उद्योग, महाराष्ट्र, राष्ट्रीय

शिवभोजन नंतर आता भाजपाची दीनदयाळ थाळी

शिवसेनेच्या बहुचर्चित शिवभोजन थाळीनंतर आता भाजपाने आता दीनदयाळ थाळी चालू केली आहे. पंढरपूरमधून या दीनदयाळ थाळी योजनेची सुरुवात झाली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना डोळयासमोर ठेऊन या भाजपाने दीनदयाळ थाळीची सुरुवात केली आहे. शिवभोजन थाळीच्या तुलनेत दीनदयाळ थाळीची किंमत थोडी जास्त आहे. पण या थाळीमध्ये १० पदार्थ आहेत. शिवभोजन थाळी १० रुपयांना तर, दीनदयाळ […]

Read more