प्रशांत दामले यांना दीनानाथ
पुरस्कार जाहीर:
====================================
मुंबई : प्रदीर्घ
नाट्यसेवेसाठी दिला जाणारा ‘मास्टर
दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा
प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
हृदयनाथ मंगेशकर यांनी या
पुरस्काराची घोषणा केली.
‘कार्टी काळजात
घुसली’चा १००वा प्रयोग
दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या
वेळी घोषणा करण्यात
आली.
प्रशांत दामले हे उत्तम कलाकार आहेत आणि
त्यांनी मराठी
रंगभूमीची
गेली तीन दशके अविरत
सेवा
केली आहे.
हा पुरस्कार देताना प्रशांत यांचे वय
कमी असल्याचा मुद्दा उपस्थित
झाला, पण कमी वयातही
त्यांनी केलेली
कामगिरी मोठी आहे.
त्यामुळे पुरस्कारासाठी
त्यांचीच निवड योग्य असल्याचे
हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.
हा प्रयोग पाहण्यास हृदयनाथ मंगेशकर
यांची कन्या आणि पार्श्वगायिका राधा
मंगेशकरही उपस्थित होत्या.
पुरस्कारांचे वितरण एप्रिलमध्ये मास्टर
दीनानाथ यांच्या
पुण्यतिथीदिनी गानकोकिळा
लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. या
वेळी दामले यांनी त्यांच्या
३३ वर्षांच्या
कारकिर्दीतील हा एक
महत्त्वाचा आणि अविस्मरणीय
टप्पा असल्याचे नमूद केले.
(प्रतिनिधी)
हा टप्पा गाठेन असे वाटले नव्हते!
नाबाद शंभरीविषयी दामले
म्हणाले, ‘मी
रंगभूमीवरील
कारकिर्दीत ११ हजार नाट्यप्रयोगांचा
टप्पा पार करेन, असे कधी वाटलेच
नव्हते, पण कुटुंबाची साथ,
मित्रपरिवाराने दाखवलेला विश्वास आणि
रसिकांनी भरभरून दिलेले प्रेम, यामुळे
मला हे साध्य करता आले. ‘कार्टी
काळजात घुसली’ या
नाटकातील कालिदास कान्हेरे अर्थात
कांचनच्या वडिलांची भूमिका हे
माझ्यासाठी एक आव्हान होते.’