पहिल्यांदाच अतुल यांनी प्रयोगशाळेत बेडूक फाडताना पाहिला तेंव्हा त्यांना धक्का बसला आणि ते बेशुध्द पडले. त्यानंतर त्यांनी डॉक्टर होण्याचा विचार सोडून दिला. मात्र अतूल यांची ही कमजोरी आणि अपयश त्यांना नंतर यशस्वी उद्योजक म्हणून पुढे जाण्यास कारणीभूत ठरेल हा विचार त्यांनी देखील केला नव्हता.

आय टी कंपनी सुरू करणारे दलित उद्यमी अतूल पासवान बिहार मधील प्रमूख उद्यमी आहेत. इतकेच काय त्यांनी देशाबाहेर जाऊनही जपान सारख्या देशात भारताच्या श्रमांच्या शक्तीचा परिचय दिला आहे. अतुल यांनी ठरवले असते तर ते भल्या मोठ्या पगारावर नोकरी करू शकले असते, मात्र त्यांनी मळलेल्या वाटेने न जाण्याचा विचार केला. त्यांच्या यशाची कहाणी लोकांसमोर मोठा प्रेरणास्त्रोत म्हणून उभी राहिली आहे.

स्वप्ने पाहणे आणि यश मिळवण्याची अपेक्षा करणे चांगलेच आहे, मात्र ती पूर्ण करण्याची हिंमत फारच थोडे दाखवितात. बिहारच्या सिवान जिल्ह्यातील अतूल पासवान यांनी लहानपणा पासून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहीले. मात्र त्यांना हे माहिती नव्हते की त्यामध्ये चिरफाड देखील करावी लागते. पहिल्यांदा त्यानी जेंव्हा विद्यार्थ्यांना बेडूक फाडताना पाहीले, त्यावेळी ते भोवळ येवून बेशुध्द झाले त्यानंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न बाजूला केले.

दिल्लीने दाखविला नाव मार्ग

त्याचवेळी एका मित्राने सांगितले की, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विदेशी भाषा पदवीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. या अभ्यासानंतर त्यांना परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकते. अतुल यांनी जपानी भाषेत पदवीसाठी परिक्षा दिली आणि त्यांची निवड देखील झाली. मात्र त्यांच्यासाठी इंग्रजीचा प्रश्न होता. ती भाषा आल्याशिवाय अभ्यास करता येणार नव्हता. त्यांचे शालेय शिक्षण हिंदीतून झाले होते. पण जिथे इच्छा तिथे मार्ग असतो असे म्हणतात ते खरे झाले, अतुल यांनी दाक्षिणात्य सहका-यांसोबत राहून इंग्रजी शिकले आणि जपानी भाषेचा अभ्यास देखील पूर्ण केला. १९९७मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. तोपर्यंत त्यांना ही जाणिव झाली होती की केवळ विदेशी भाषा शिकून त्यांची कारकिर्द आयुष्यभर सुरक्षित राहू शकत नाही. त्यांनी एमबीए करण्याचा निर्णय घेतला आणि पुदूचेरी विद्यापीठात दाखल झाले. येथे शिक्षण घेताना त्यांना सॉफ्टवेअरच्या दुनियेशी जवळून परिचय करून घेता आला, आणि आयटी क्षेत्रात कर्माचा-यांना मिळणा-या तगड्या वेतनाबाबतही माहिती मिळाली त्याने ते आकर्षित झाले. अभियांत्रिकीची पदवी असल्याशिवाय या क्षेत्रात जाणे शक्य नव्हते. अतुल यांच्या विदेशी भाषेच्या ज्ञान आणि एमबीएच्या शिक्षणामुळे ही उणीव दूर झाली आणि त्यांना जपानची मोठी कंपनी फुजित्सू मध्ये नोकरी मिळाली.

जपान मध्ये राहून त्यांना जाणिव झाली की भारताच्या मोठ्या आय टी कंपन्या देखील जपानमध्ये व्यवसाय करू शकल्या नाहीत कारण त्यांना जपानी बोलणारे अभियंता मिळू शकले नाहीत. त्यामुळे भारताचा सॉफ्टवेअर उद्योग बहुतांश अमेरिका आणि यूरोपात सक्रीय आहे जेथे सर्वसाधारण इंग्रजी भाषा आहे. अतूल यांनी हे देखील पाहीले की जपान मधील राष्ट्रवाद अशा प्रकारचा आहे की तेथील लोक आणि कंपन्या विदेशी आयात आणि तत्सम गोष्टींना फारसे महत्व देत नाहीत. जपानच्या बाजारपेठेला समजल्या नंतर त्यांनी ठरविले की, ते जपान मध्ये आयटी कंपनी सुरू करतील.

सन २००५च्या शेवटी अतूल यांनी आपली कंपनी इंडो सुकूरा ची स्थापना केली. इंडो सकूरा एका फुलाचे नाव आहे, जे जपानमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. खरेतर सुकरा फूल आहे आणि इंडो सकूरा त्याची आणखी एक प्रजाती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जपान मध्ये अतुल यांच्या स्पर्धेत कुणीच नव्हते त्यामुळे त्यांचा उद्योग सुरू राहिला. २००६मध्ये त्यांनी भारताची आयटी राजधानी समजल्या जाणा-या बंगळुरू येथे कार्यालय सुरू केले. मात्र येथेही जपानी भाषेची अडचण होती. त्यांनी त्यांच्या अभियंत्यांना जपानी भाषेत पांरगत करण्यासाठी शक्कल लढवली. एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला ज्यात त्यांचा जपान ची कंपनी ओमरान सोबत करार झाला. यातून ही कंपनी त्यांच्या अभियंत्यांना जपानी भाषेचे प्रशिक्षण देत होती आणि प्रशिक्षित अभियंत्याना निम्मे निम्मे वाटून घेत होती. अतूल यांचे काम सोपे होत होते मात्र त्यांना माहिती नव्हते की पुढच्या काळात त्यांना समस्या येणार आहेत. सन २००८ अतूल यांच्यासाठी अडचणीचे ठरले. एका कंपनीसाठौ सॉफ्टवेअर तयार करताना भाषेच्या वैविध्यामुळे इंडो सुकूराच्या अभियंत्याकडून चूक झाली. ग्राहकाला हवे तसे सॉफ्टवेअर तयार झाले नाही. त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेच शिवाय वेळ वाया गेला. त्यामुळे ग्राहकाने त्यांना न्यायालयात जाण्याची धमकी दिली. कायद्याच्या कचाट्यात सापडलो तर भुर्दंड पडेल त्यामुळे अतूल यांना ते परवडणारे नव्हते. कसेही करून समझोता झाला आणि त्यांना त्यांचा नफा सोडावा लागला. 

Nav Maharashtra

इतके मोठे नुकसान त्यांच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हते. त्यांनी विचार केला की यापेक्षा एखादी नोकरी केली तर बरे. कमीत कमी पगार तरी मिळाला असता. मात्र या निराशेतून अतूल यांनी स्वत:ला सावरले आणि विचार केला जी ही चूक नोकरी करताना केली असती तर ती सोडावी लागली असती आणि दंड भरावा लागला असता त्यानंतर जो संघर्ष निर्माण झाला असता तो यापेक्षा कठीण झाला असता. त्यामुळे त्यांनी पुन्हा कामात लक्ष दिले. त्यांच्या मेहनतीला मग यश आलेच २०११-१२ मध्ये अतुल यांच्या कंपनीने २० कोटी रूपयांची उलाढाल केली.

नुकतेच कुठे संघर्षातून बाहेर पडले होते आणि आणखी एका समस्येने त्यांना घेरले. २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीच्या फटक्याने जपानसह त्यांना हादरवून टाकले. त्यावेळी अतूल बिहारमध्ये त्यांच्या गावी आले होते. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. अतुल यांना पुन्हा परत जाणे शक्य नव्हते मात्र फोनवर अभियंत्याशी आणि ग्राहकांशी संपर्क ठेवून होते. तिकडे जपानमध्ये अशी भिती निर्माण झाली होती की, अणूभट्टीतून किरणोत्सर्जन होवून ते टोकीयो शहरात पसरले असते जेथे त्यांचे कार्यालय होते. ते ऐकून त्यांच्या आईने त्यांना परत जाण्यास विरोध केला. मात्र आपली जबाबदारी ओळखून त्यांनी तिचे मन वळवले आणि माघारी टोकीयोला गेले. भूकंप आणि त्सुनामीने जपानचा विध्वंस झाला होता. रस्ते तुटले होते. चारी दिशांना वीज नव्हती. पुन्हा नव्याने व्यवसाय उभा करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केली. मात्र नंतर स्थिती बदलत गेली. त्यांचे बहुतांश अभियंता काम सोडून गेले होते त्यामुळे जपानी कंपन्यांना इंडो सुकूरावर विश्वास राहीला नव्हता. त्यांना भिती होती की, ही कंपनी बंद झाली तर त्यांचे नुकसान होईल. वर्षभरात कंपनीची उलाढाल निम्म्यावर आली होती. आता अतुल यांना सॉफ्टवेअर कंपनीशिवायही असे काही करायचे होते की, ज्यातून त्यांचे उत्पन्न सुरू राहणार होते. एकाच कंपनीवर विसंबून राहणे शक्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी हेल्थ केअर कंपनीची कन्स्ल्टंसी सुरू केली. त्यातून ते भारतात काम करणा-या १५०० जपानी कंपन्याच्या पन्नास हजार कर्मचा-यांना आरोग्य सुविधा विकत होते. केवळ एका फोनवर ते त्यांना वैद्यकीय सुवुधा उपलब्ध करून देत होते. आता अतुल यांच्या उलाढालीचा दहा टक्के भाग याच व्यवसायातून येतो. त्याच्या इंडो सकूराची उलाढाल देखील १५ कोटीच्या घरात पोहोचली आहे.

भेदभावाचा करावा लागला सामना

बिहारच्या छोट्या गल्लीतून बाहेर पडलेल्या दलित व्यक्तीला या उंचीवर पोहोचताना खूप खस्ता खाव्या लागल्या. वेगवेगळ्या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, दलित असल्याने त्यांना जपान मध्ये तर काही नुकसान झाले नाही मात्र एकदा भारतातील एका कंपनीने त्यांना काम देण्यास नकार दिला होता. मात्र अतुल याला खूप मोठी गोष्ट मानत नाहीत. कारण त्यांच्यातील क्षमतेने एकमार्ग बंद झाला त्यावेळी नवे हजार दाखवून दिले आहेत.