राज्यातील बैलगाडा शर्यतींवर बंदी उठविण्यासाठी गाडामालक व शेतकºयांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्या वेळी अनेक शेतकºयांवर खटले
दाखल केले. मात्र, बैलगाडा बंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार असल्यामुळे संबंधित शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत राज्य सरकारने पाठविलेल्या विधेयकावर राष्ट्रपती यांनी नुकतीच स्वाक्षरी केली. केंद्र सरकारच्या गृहखात्याकडे संबंधित विधेयक दाखल झाले. त्यानंतर राज्यातील बैलगाडा मालकांवर दाखल केलेल्या खटल्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. संबंधित गाडामालक आणि शेतकºयांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांवरील खटले मागे घ्यावेत, अशी मागणी आमदार लांडगे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात. या मागणीसाठी गेल्या ७ ते ८ वर्षांपासून विविध बैलगाडा मालक व प्रेमी संघटना तसेच सामान्य शेतकºयांनी सनदशीर मार्गाने खेड, शिरूर, आंबेगाव, चाकण, जुन्नर आदी भागांत प्रभावी आंदोलने केली. राज्यातील अन्य भागांतही आंदोलने करण्यात आली.