Ticker

6/recent/ticker-posts

ड्रग्ज देऊन महिलांवर केले बलात्कार,अत्याचाराचे बनवायचा व्हिडिओ

Balesh-dhankhar
Balesh Dhankhar

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे बालेश धनखर (Balesh Dhankhar) नावाच्या एका भारतीय उद्योजकाने माणुसकीला लाज वाटेल असे कृत्य केले आहे त्याने नोकरीचे प्रलोभन दाखवून ड्रग्ज देत पाच महिलांवर बलात्कार केले,. 

बालेश धनखर नावाचा सिडनी स्थित एक भारतीय उद्योगपती त्याला बलात्काराच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आले आहे सिडनीतील डाऊनिंग सेंटर मधल्या एका जिल्हा न्यायालयाने त्याला सोमवारी दोषी ठरवलं, पाच महिलांना त्यांनी नोकरीचे आमिष दाखवून त्यांना ड्रग्ज दिलं व ड्रग्जच्या आहारी गेल्यानंतर त्यांच्यावर क्रूरतेने बलात्कार करण्यात आला, इतकच नाही तर या नराधमाने महिलांवर बलात्कार करताना त्यांचे व्हिडीओ काढले. 

न्यायालयाबाहेर बालेश धनखरला अटक करण्यात आली असताना तो कॅमेरा पासून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्याचबरोबर त्यांने सोशल मीडियावर असलेले त्याचे फोटोही डिलीट केले. 

धनखर याने ओव्हरसीज फ्रेंड ऑफ बीजेपी (Overseas Friends of Bjp )चे नेतृत्व केले आहे जी भारतातील सत्तारूढ पार्टीचा समर्थक गट आहे.  

Balesh Dhankhar photo with Narendra modi

बालेश धनखरच्या वेबसाईट वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेटीचा आणि एन एस डब्ल्यू सरकारच्या या कार्यक्रमांमध्ये भाषण करताना चे फोटोज उपलब्ध आहेत.

जेव्हा पोलिसांनी ऑक्टोंबर २०१८ मध्ये धनखरच्या सीबीडी अपार्टमेंट मध्ये छापा टाकला  त्यावेळी त्यांना तिथे महिलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओज आढळून आले,धनखर हा नोकरीच्या जाहीरात देत होता व मुलाखत देण्यासाठी आलेल्या महिलांना आपले सावज बनवयचा धनखर महिलांना ड्रग्ज देवून बेशुद्ध अवस्थेत त्यांच्यावर बलात्कार केले व त्याचे व्हिडीओ बनवले असे एकूण १७ व्हिडीओ आढळून आले.

न्यायालयाने बालेश धनखरला दोषी घोषित केले असून त्याच्यावर ३९ आरोप लावले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात