Ticker

6/recent/ticker-posts

थारच्या मैदानात विजयी झालेला कोण आहे बकासुर?

बकासुर बैल मुळशी Bakasur Sharyat



थारच्या मैदानात विजयी झालेला कोण आहे बकासुर?

नुकत्याच पार पडलेल्या रुस्तम-ए-हिंद बैलगाडा शर्यतीत १९ लाखाची महिंद्रा थार जिंकणारा आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रात "बकासुर" या नावाने नावारूपास आलेला,ज्याचा वेग बघण्यासाठी लोक गर्दी करतात हा बकासुर बैल नेमका कसा आहे?त्याचे मालक कोण? त्याचा खुराक काय आहे? आणि महत्वाचे म्हणजे हा इतका का पळतो?


सुसगाव तालुका मुळशी येथील श्री मोहील धुमाळ यांच्या मालकीचा असणारा "बकासुर बैल"दिसायला साधी शरीरयष्टी, आखूड शरीर,बारीक उंची व गावठी पैदाशीचा, गावरान गाई व खिलार बैल याच्या क्रॉस ब्रीडचा हा बकासुर,या बैलामध्ये कोणतीही पळाव बैलाची लक्षणे दिसत नसली तरीही हा पळतो आणि जिंकतोही हे विशेष. 

Mohil Dhumal Mulashi



बकासुराचा खुराक काय? 

हिरवे गवत हे त्याच्या आवडीचे खाद्य,त्याचबरोबर उडदाची डाळ,मक्याचा भरडा व शेंगदाणा पेंड आणि दूध हा खुराक म्हणून त्यास दिले जाते,अंडी,फळफळावळ असले काहीही त्यास दिले जात नाही, याचे मालक बोलताना सांगतात की ते त्यास गाईच्या दोन सडातील दूध पाजत असत.

बकासुर हे नाव कसं मिळाल?

लहान असताना याच नाव मालकांनी 'सरपंच' ठेवल होत पण हा मुुळशीचा असल्याने आणि पळण्याचा कोणताही सुमार नसल्याने,झेंडा पडला की हा पळत सुटतो त्यामुळेच एकदा अनाउंसरने एका शर्यतीच्या दरम्यान त्यास बकासुर म्हणून संबोधले आणि बनला हा मुुळशीचा बकासुर, पब्लिक किंग बकासुर वेगाचा बादशहा म्हणून त्यात संबोधले जाते.

लहान असताना घोडीच्या मागून चरायला डोंगरात जाणारा हा बकासुर, डोंगरदरीत हिंडणारा असल्याने तो काटक झाला आहे,वयाच्या नऊ महिन्यापासून शर्यत करत आहे,पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळवणे ही त्याची खासियत आहे,बकासुर ने आजपर्यंत महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी ,रुस्तम-ए-हिंद त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण ,ठाणे ,मुंबई, नाशिक या ठिकाणी आपल्या नावाची हवा निर्माण केली आहे.

रूस्तम ए हिंद;बैलगाडी शर्यत, बकासुर-महिब्या ठरला मानकरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात