Black_spots |
चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून आहे आणि चेहऱ्यावरून बऱ्याच वेळा माणसाची पारख केली. जाते सर्वांना सुंदर दिसावे असे वाटते. पण चेहऱ्यावर डाग,सुरकुत्या दिसू लागली तर वक्तीला अवघडल्यासारखे वाटते. आपण बाजारात उपलब्ध क्रीम आणि औषधांचा सर्रास वापर करतो पण बऱ्याच वेळा साईड-इफेक्ट भोगायला लागतात. अशा वेळी घरगुती उपाय करायला काही हरकत नाही.
झटपट चेहऱ्यावर चे काळे डाग घालवा Black Spots
1) हळद फार पूर्वी पासून त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरली जाते. हळद, लिंबाचा रस आणि कच्चे दूध त्याची पेस्ट करून चेहऱ्यावर हा थर वाळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा.
2) मध आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण चेहऱ्यावरील काळे डागांसाठी उपयुक्त ठरते. दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून लावा चेहरा तजेलदार होते.
3) चेहऱ्यावरील उजळपणा टिकवून ठेवण्यासाठी चंदनाचा उपयोग आयुर्वेदात केला जातो. चंदन आणि गुलाब पाणी यांचा लेप चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग निघून जाण्यास मदत होते.
4) बटाटा हा तर सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असते. बटाटा कापून थोड्यावेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा. आणि मग चेहऱ्यावर जेथे काळे डाग असतील तिथे हा बटाटा चोळा नियमित वापराने परिणाम नक्कीच दिसून येईल.
5) चेहर्यावरील काळा डागांवर 15 ते 20 मिनिटे ताक लावून नंतर चेहरा धुवा.
6) सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोरफडीचा वापर औषधी गुणधर्म मुळे केला जातो. कोरफडीचा चेहऱ्यावरील काळे डागांवर लावा आणि नंतर थोड्या वेळाने तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा.दिवसातून दोन वेळा नियमितपणे हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग नक्कीच कमी होतील.
0 टिप्पण्या