स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण बघण्यारा अशा व्यक्तींसाठी राज्य सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे, ती म्हणजे “महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना”. मांस व्यवसायासाठी ब्रॉयलर कोंबड्या व अंडी उत्पादनासाठी लेयर्स कोंबड्या या दोन्ही अशा प्रकारच्या उत्पादनासाठी ही कुक्कुटपालन योजना सरकारने आपल्या समोर आणली आहे. या योजनेच्या मार्फत आपल्या सर्वांचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील यात तिळमात्र शंका नाही. या योजनेच्या आधारे आपल्याला कुक्कुट उभारणी साठी माफक धनराशी मिळू शकते आणि त्यातून तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुक्कुटपालन उभारून चांगला व्यवसाय सुरू करू शकता. महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक व्यक्ती अर्ज करून कुक्कुटपालन पालन उभारणी साठी कर्जराशी मिळवू शकता.
Kukut Palan Yojana Maharashtra
महाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेच्या माध्यमातून प्रदान करण्यात येणारी राशी:
- आपण जर कुक्कुटपालन करू इच्छित असला तर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून अर्ज केल्यास बँकेकडून कर्ज मिळू शकते. ती कर्जराशी 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये पर्यंत असू शकते
- जर आपण पोल्ट्री व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रदान करण्यात येऊ शकतात.
- या योजनेच्या मार्फत मिळणाऱ्या कर्जातून तुम्ही फक्त कुक्कुट पालन सुरू करू शकता.
- सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील बेरोजगार युवक ज्यांच्याकडून स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
- ह्या योजने मधून मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बॅंक 7 लाखापर्यंत कर्ज देईल.
- या योजनेसाठी लोन फक्त सरकारच्या नाबार्ड बॅंक मधूनच अर्ज करू शकतो
Objective of Kukut Palan Yojana
कुक्कुटपालन योजनेचा उद्देश
- कुक्कुटपालन योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील वाढती बेरोजगारी आणि कृषी विभागाला चालना मिळणे हा आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे तो व्यक्ती या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.
- या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय मिळणार आहे.
- कुक्कुटपालन चालू झाल्यानंतर शेतकरी मांस आणि अंडी यांचाही व्यवसाय करू शकतो.
- या कुक्कुट पालन कर्ज योजनेचा लाभ शेतकरी किंवा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही अडचणी शिवाय घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना सावकाराला सामोरे जावे लागणार नाही.
- या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना आणि व्यक्तींना रोजगार मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.
- न शेळी पालन मत्स्य पालन हे व्यवसाय करत असेल त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- कुक्कुटपालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- ज्या शेतकऱ्याने आधीच कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
- शेतकरी असला पाहिजे.
- महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
- महाराष्टाचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजेत.
- व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.
Required Documents of Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- सातबारा उतारा
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक अकाउंट
- नंबर मोबाईल नंबर
How to apply for Kukut Palan Yojana Maharashtra
कुक्कुटपालन योजनेची अर्जाची प्रक्रिया
- जर आपणास कुकूटपालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास जवळील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन योजनेबद्दल सांगावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याकडून कर्जाबद्दल माहिती मिळेल व तुम्हाला अर्ज नमुना सुपुर्द करण्यात येईल.
- तुम्हाला अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि लागणारी कागदपत्रे अधिकार्यांकडे सुपूर्द करावी लागतील.
- बँक कर्मचारी पुढच्या कुक्कुटपालन व्यवसायाच्या जमिनीला भेटत देतील
- आपल्या गुंतवणुकीवर बँक 75 टक्के कर्ज तुम्हाला सुपूर्द करते.
- तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि पडताळणीनंतर तुम्हाला कर्जाची राशी सुपुर्द करण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक | अधिकृत वेबसाईट लिंक |
0 टिप्पण्या