Ticker

6/recent/ticker-posts

आलिशान हाॅटेलमध्ये तीन महिने राहिला,बिल न देताच पळून गेला

 

Luxury-hotels-in-delhi-run-without-paying-bill

दिल्ली येथील एका लक्झरी हॉटेल लीला पॅलेसमध्ये तीन महिने राहून एक तरुण बिना पैसे देता तेथून फरार झाला होता युवकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

राजधानी दिल्लीतील एका आलिशान हॉटेलला २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे, लक्झरी हॉटेल लीला पॅलेसमध्ये तीन महिने येथील युवक राहिला,तेथील सुविधांचा लाभ घेतला व न पैसे देता तिथून फरार झाला,त्याने स्वतःला एका राज परिवारातील असल्याचे सांगितले होते आणि बनावट आयडी कार्ड जमा केलं होतं हॉटेल प्रशासनाने सांगितले की 24 लाख रुपयांचे बिल झाले आहे ते न देता तो तिथून पळालेला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार १ ऑगस्ट 20 ते नोव्हेंबर पर्यंत युवक तिथं बनावट आयडी च्या आधारे हॉटेलमध्ये थांबला होता बनावट आयडी कार्ड वर त्याचं नाव मोहम्मद शरीफ हे आहे,हा युवक 20 नोव्हेंबर च्या रात्री कुणालाही न सांगता आपले साहित्य घेऊन आणि हॉटेलातील काही चांदीची भांडी घेऊन तिथून पळालेला आहे.

या प्रकरणी या युवकाला कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आलेली असून त्याच्यावर आयपीसी ४१९,४२०,३८०अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात