Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीच्या आमदाराने केली वडिलांना धक्काबुक्की

Ravindra-kshirsagar-police-complaint-against-sandip-kshirsagar


बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असलेले आमदार संदिप क्षीरसागर यांनी त्यांचे वडिल रविंद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप रविंद्र क्षीरसागर यांनी केला आहे.

गजानन कारखान्याचे अध्यक्ष व माजी सभापती असलेले रवींद्र क्षीरसागर यांनी त्यांची दोन्ही मुले आमदार असलेले संदिप क्षीरसागर  व अर्जुन क्षीरसागर यांच्याविरोधात बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे,मागील वर्षीच संदिप क्षीरसागर यांच्या मातोश्री व रविंद्र क्षीरसागर यांच्या पत्नी रेखाताई क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.


क्षीरसागर हे कुटुंब बीड जिल्ह्य़ातील राजकीय मातब्बर कुटुंब अशी त्यांची ओळख आहे,राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर, आपल्या वडिलांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. याविषयी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, की काल रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या दोन मुलांविरुद्ध तक्रार केली होती. मला माझ्या दोन मुलांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केलीय. त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांचे नाव असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात