Ticker

6/recent/ticker-posts

रूस्तम ए हिंद;बैलगाडी शर्यत, बकासुर-महिब्या ठरला मानकरी

 

Ruston e hind bailgadi sharyat

Rustom E Hind Bailgadi Sharyat

रुस्तम-ए-हिंद बैलगाडा शर्यत, मुळशीच्या बकासुर आणि रेठरेच्या महिब्या या  बैल जोड्यानं मैदान मारलं



डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित रुस्तम-ए-हिंद बैलगाडा सांगलीत पार पडलीये. या शर्यतीत रुस्तम-ए-हिंद केसरीचा मानकरी मुळशीचा बकासुर बैल आणि रेठरेच्या महिब्या बैैलजोड ठरला..बैलगाडा शर्यतीत बाजी मारलेल्या बैल जोडीच्या मालकाला १९ लाख रूपये किंमतीची थार गाडी भेट देण्यात आलीय.

तर दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाच्या विजय बैलजोडीस ट्रॅक्टर बक्षीस, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर मोटरसायकल व सहाव्या क्रमांकास ई बाईक हे बक्षीस वितरण करण्यात आले. 

गटात विजय होणार्‍या बैलजोडीस एक किलो गुलाल व चांदीची गदा हे बक्षीस देण्यात आले.

Bakasur Bailgada Sharyat Vijayi

देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यती पार पडणार असल्याचा आयोजक पैलवान चंद्रहार पाटील यांचा दावा आहे. महाराष्ट्र राज्यातील 200 च्या वर टॉपच्या बैलगाडी मालक यांचा बैलगाडी चालकांसह सहभाग नोंदवला आहे.


बैलगाडी शर्यत सुरू होण्यापूर्वी बैलांची पूजा करण्यात आली. त्यानंतर शर्यतीला सुरुवात झाली. दोनशेच्या वर बैलजोड्या मालकांनी या शर्यतीत हजेरी लावली. ही बैलजोडी शर्यत पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 
Ruston e hind bailgadi sharyat

Ruston e hind bailgadi sharyat

Ruston e hind bailgadi sharyat


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात