heatstroke : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात वाढलेली उष्णता पाहता लोकं खूप त्रासलेली आहेत. वाढत्या गरमीमुळे नागरिक हैराण झाले असून, एप्रिलनंतर मे आणि जून महिन्यात आणखी उष्णता वाढेल. अशावेळी वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्माघाताने अनेक समस्या उद्भवत आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच 5 गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन केल्यामुळे तुम्हाला उष्माघाताचा त्रास होणार नाही. खालील गोष्टीचे सेवन केल्यामुळे तुम्ही उष्णतेपासून स्वतःला वाचवू शकाल आणि आजारांपासूनही स्वतःचा बचाव करण्यास सक्षम व्हाल.
कडक उन्हाळ्यामध्ये या 5 अत्यावश्यक गोष्टींचे सेवन आवर्जून करावे.
heatstroke
भरपूर पाणी प्या
उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्याचे काम पाणी करते. उन्हाळ्यात किमान 7 ते 8 ग्लास पाणी दररोज प्यायला हवे.
भरपूर काकडी खा
उन्हाळ्यात काकडी खूप फायदेशीर मानले जाते. काकडीत भरपूर पाणी असते. त्यामुळे काकडीचे सेलड, कोशिंबीर आणि ताक बनवून तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकतात. काकडीत फायबर आणि इतर जीवनसत्त्वेही आढळतात, त्यामुळे शरीराला गारवा मिळतो.
लिंबू पाणी प्यावे
उन्हाळ्यात लिंबू पाण्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला उष्माघातासारखी समस्या भेडसावणार नाही. लिंबू पाणी उष्णतेपासून बचाव तर करतेच पण शरीर आतून ताजेतवाने ठेवण्यास देखील मदत मिळते.
कच्चा कांदा खा
कांदा हा थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यात कच्चा कांदा जरूर खावा. उन्हाळ्यात कांदा पोटाचे आरोग्य चांगले ठेवतो. तुम्ही सॅलडच्या स्वरूपातही कांदा खाऊ शकता.
दही आणि लस्सी
कडक उन्हात शरीराला थंडावा देण्यासाठी रोजच्या आहारामध्ये दही किंवा लस्सीचा समावेश आवर्जून करावा. खरं तर, दही आणि लस्सीच्या सेवनामुळे पोटाला थंडावा मिळतो. तसेच वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यास मदत देखील होते.
वरील दिलेल्या पद्धतीचा अवलंब केल्यास तुम्हाला उन्हाळ्यात उष्णतेच्या समस्या उद्भवणार नाहीत. आणि तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटू शकता.
0 टिप्पण्या