पुणे : Pune Crime News | खासदार व बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी दिल्याप्रकरणी (Sanjay Raut Threat Case) पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) एका तरुणाला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) हवाली केले आहे. (Pune Crime News)
राहुल तळेकर Rahul Talekar (वय २३, रा. चंदननगर) असे या तरुणाचे नाव आहे. खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर एके ४७ (AK 47) ने उडवून टाकू अशी धमकी देणारा मेसेज राऊत यांना आला आहे. काल राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचे मेसेज आले होते. (Pune Crime News)संजय राऊत यांच्याकडे याबाबत पोलिसांनी चौकशी केली.त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची माहिती पुणे पोलिसांना देऊन मोबाईल क्रमांक कळविला.
पोलिसांनी काल रात्री चंदननगर (Chandan Nagar Pune) परिसरातून राहुल तळेकर याला ताब्यात घेतले.तो एका हॉटेलमध्ये काम करतो. पुणे पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या हवाली केले आहे.राहुल तळेकर याने राऊत यांना असे मेसेज का केले, त्याला असे मेसेज करायला कोणी सांगितले कायाबाबत अधिक तपास मुंबई पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या