पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात कोट्यावधी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. या नोटांचा संबंध हवाल्याशी आहे का? कर्नाटक निवडणुकीसाठी या नोटा जात होत्या? हे प्रश्न निर्माण झाले आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीनसुद्धा सापडले आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला तब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली. पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना पोलिसांच्या पथकाला ही रक्कम मिळाली. या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांना नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमध्ये सापडल्या. सोमवारी मध्यरात्री ६ पिशव्यात कोट्यावधी रुपयांची ही रक्कम पुणे पोलिसांना मिळाली. या नोटांबरोबर पैसे मोजण्याचे मशीन मिळाले.या प्रकरणात गांधी आडनाव असलेल्या ४० ते ४२ वय असलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का? किंवा १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नोटा पाठवल्या तर जात नव्हत्या, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. चौकशीतून काय मिळेल, त्यानंतर या प्रकारणाच्या तपासालाही गती येणार आहे.दरम्यान पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे. आता सापडलेले पैसे कोणाचे आहेत? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे.
0 टिप्पण्या