शिवसेना पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र दिल्लीतील नेत्यांच्यात शिजत असल्याचे आरोप केले होते दरम्यान वज्रमूठ सभेतदेखिल आरोपाचा पुनरुच्चार केला होता मात्र शरद पवारांनी लोक माझे सांगाती हे या पुस्तकात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या मनामध्ये नाही असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या आरोपांमध्ये हवाच काढून टाकली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी झाली याशिवाय पवारांनी उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या पक्षाच्या भूमिकांवर देखील प्रश्न उपस्थित केलेत, शिवसेनेच्या हिंदुत्ववादाचा समाचार हा शरद पवारांनी आपल्या पुस्तकातून घेतला मुंबई केंद्रशासित करण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा महाराष्ट्रापासून वेगळी करावी असा कोणताच प्रयत्न दिल्लीतील नेत्याच्या अथवा कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काही नाही हे मी जबाबदारी न सांगू इच्छितो असं शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे दरम्यान महाविकास आघाडी आकाराला येताना कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना विचार हा मारक ठरेल अशी भीती काहीजनांना होती आणि शिवसेनेच्या बाबतीत माझे मत घेतले तर हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडून त्यांचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही शिवसेेनेच्या पूर्वइतिहासावर नजर टाकली तर राजकारणासाठी लागणारी लवचिकता त्यांनी वारंवार दाखवलेली आहे, मुस्लिम आणि दलित विरोधात शिवसेनेच्या भूमिकेतला एक पैलू झाला परंतु तो दिसतो तेवढा टोकाचा नाही.
यासंदर्भात शरद पवारांनी आपली मतं आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात्मक पुस्तकामध्ये मांडलेली आहेत.
0 टिप्पण्या