भारतीय जनता पक्ष सेवा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश व महा एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने मन की बात या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संवाद कार्यक्रमाच्या शंभराव्या प्रसारण सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या विचारांना राज्यभरात पोहोचवण्यासाठी काम करणारे सार्वजनिक जीवनात सक्रिय असणाऱ्यां युवकांना मन की बात प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला,(Mann Ki Baat) सोलापूर जिल्ह्यातून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस युवा ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे (Vikas Waghmare) यांना हा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.
राष्ट्र प्रथम हे ध्येय घेऊन राजकारण करणारा एकमेव भाजप हा पक्ष आहे त्या पक्षाच्या विचारांना सामान्य माणसांमध्ये घेऊन जाण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी आमच्यात आहे सामान्य माणसांसाठी सत्ता राबवली पाहिजे आणि हाच भाजपचा अजेंडा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दृष्टीने प्रचंड मोठे काम होत आहे सामान्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणेसाठी हा पुरस्कार मला दिला, त्यामुळे अजून काम करण्याची ऊर्जा मिळाली, मात्र राष्ट्र प्रथम ध्येय असणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या विचारांना वाहक होणं हे तर भारतीय म्हणून माझे कर्तव्य असल्याचे मत भाजयुमो जिल्हा सरचिटणीस तथा युवा ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे यांनी बोलताना व्यक्त केले.
विकास वाघमारे हे भाजपचे अत्यंत अभ्यासू व आक्रमक युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या अभ्यासू भूमिकेमुळे राज्यभरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच वाघोली येथील ग्रामपंचायतीने वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते निवडून दिले आहेत,भारतीय जनता पक्ष हा विरोधी पक्षाचे काम करत असताना विविध आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून ही आवाज उठवला होता तसेच शेतकरी प्रश्नांवर देखील ते आवाज उठवत असतात. या पुरस्कारामुळे त्यांचे राज्यभरातून कौतुक होत आहे यावेळी भाजप सेवा प्रकोष्ठ चे प्रदेश संयोजक शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
0 टिप्पण्या