Ticker

6/recent/ticker-posts

भ्रष्ट मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात



धुळे – सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची दुर्दशा व मनमानी  कारभार हा वारंवार समोर येत असतो. कोणत्याही सरकारी काम हे टेबल खालून पैसे दिल्याशिवाय होत नाही हे आता अधोरेखित झाले आहे. लाखोंच्या पगार असणाऱ्या गरीब सरकारी अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्यांची काही देणे घेणे नसून बाप बढाना भैया सबसे बडा रुपय्या अशीच त्यांची कार्य करण्याची प्रणाली होऊन बसली आहे असा समज आता नागरिकांनी खुद्द करून घेतला आहे. मात्र काही प्रामाणिक अधिकारी सोडले तर इतर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आता नागरिक देखील जागरूक झाले असून नागरिकांच्या जागरूकतेने भ्रष्ट अधिकाऱ्यांचे   पितळ उघडे पडत आहे. शिरपूर तालुक्यातील अशाच एका भ्रष्ट मंडळ अधिकाऱ्याला तक्रारदार याने धडा शिकवला आहे. सदर अधिकारी 10000 रुपयांची लाज घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.


जमिनी संदर्भात यापुर्वी केलेल्या हक्कसोडच्या कामाचे बक्षीस म्हणुन तसेच ७/१२ उता-यावर चुकून झालेल्या विहीरीची नोंद कमी करण्याबाबतची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी मंडळाधिकारीला राहत्या घरी 10 हजारांची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ पकडले असून गुन्हा दाखल झाला आहे.


तक्रारदार हे मौजे वकवाड, ता. शिरपुर येथील रहीवाशी असुन त्यांची वकवाड येथे वडीलोपार्जित शेत जमिन आहे. सदर शेत जमिनीमध्ये विहीर नसतांना ७/१२ उता-यावर चुकीने विहिर असल्याची नोंद झालेली असल्याने तक्रारदार यांना सदर शेत जमिनीत विहिरी साठी शासकीय अनुदान मंजुर होण्यासाठी  अर्ज करता येत नव्हता.


त्यामुळे त्यांनी ७/१२ उता-यावरील चुकीने झालेली विहीरीची नोंद कमी करणेबाबतची फेरफार नोंद मंजुर करणे बाबत विनंती केली असता मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेत जमिनी संदर्भात यापुर्वी केलेल्या हक्कसोडच्या कामाचे बक्षीस म्हणुन तसेच ७/१२ उता-यावर चुकून झालेल्या विहीरीची नोंद कमी करण्याबाबतची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी  Curreption Breaking तक्रारदार यांचेकडे १५,००० – रुपये लाचेची मागणी केल्याची तकारदार यांनी दि.०८.०५. २०२३ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनी व्दारे माहीती दिली होती. प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनी व्दारे माहीती दिली होती.


सदर माहितीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरपुर येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची तकार नोंदवुन सदर तक्रारीची दि. ०८/०५/२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे शेत जमिनी संदर्भात यापुर्वी केलेल्या हक्कसोड कामाचे बक्षीस म्हणुन तसेच ७/१२ उता-या वरील विहीरीची चुकीने झालेली नोंद कमी होणेबाबतची फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी तडजोडी अंती १०,००० रू फेरफार नोंद मंजुर करण्यासाठी तडजोडी अंती १०,००० रू पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांचे शिरपुर येथील मिलींद नगर मधील राहते घरी घेवुन येण्यास सांगीतले होते. दि.०९/०५/२०२३ रोजी मंडळ अधिकारी अशोक गुजर यांच्या शिरपुर येथील राहते घरी सापळा लावला असता मंडळ अधिकारी अशोक गुजर यांनी तक्रारदार यांच्या कडुन १०,०००/- रुपये लाच स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.


धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात