याबाबत अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले,पवार म्हणाले की सुषमा अंधारे या शिवसेना पक्षाच्या नेत्या असून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हेही शिवसेनेचे आहेत,शरद पवार यांचे समोर रडण्यापेक्षा जर सुषमा अंधारे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडल्या असत्या तर त्याठिकाणी मला जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार अंबादास दानवे यांनाही आहेत,भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात, ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत आणि सभा घेत आहेत त्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याला सांगितलं पाहिजे.”त्यांनी तिथं रडायला पाहिजे होतं असं अजित दादा पवार म्हणाले तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे म्हणाले की सुषमाताई अंधारे या तर रडरागिनी आहेत,अजित पवारांवर टीका केली की माध्यमांमधून प्रसिध्दी मिळते त्यामुळे अजित पवार यांचेवर टीका करण्याचा नवा ट्रेंड आला आहे असं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी केल.
0 टिप्पण्या