बीड केज शहरातील एका कला केंद्रावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालून काही अल्पवयीन मुली महिला आणि ग्राहकांना अटक केली होती या कला केंद्रात गुटखा दारू सिगरेट आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे उघड झाले याप्रकरणी उपस्थित ग्राहक, महिला -मुली यांच्यासोबतच कला केंद्र चालक आणि मालक रत्नाकर शिंदे यांच्याविरुद्ध देखील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नाकर शिंदे हा दीड महिन्यापूर्वीच उद्धव ठाकरे गटाच्या बीड जिल्हा प्रमुख पदी नियुक्त झाला होता यापूर्वीचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून वारंवार लाखो रुपयांची मागणी होत असल्याचे सांगत त्यांना मारहाण केली होती त्यामुळे जाधव यांची पक्षाने हकालपट्टी करत अंधारे यांच्या शिफारशीवरून रत्नाकर शिंदे याची नियुक्ती केली होती मात्र कला केंद्र चालवून मुलींचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने आता त्यांचीही हकालपट्टी करण्याची वेळ उद्धव ठाकरे गटावर आली आहे.
जिल्हाप्रमुख पदासाठी पैसे घेतल्याचा आरोप
रत्नाकर शिंदे याची नियुक्ती सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शिफारशी करण्यात आली होती, अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांनी जिल्हाप्रमुख पदासाठी पैसे घेऊन पद विकण्याचा आरोप केला आहे.
0 टिप्पण्या