बांंधकाम व्यवसाय या क्षेत्राला एखाद्या विशिष्ट वर्गाची मक्तेदारी म्हणून पाहिले जात होते अशा परिस्थितीत सामान्य, प्रतिकूल कुटुंबातून येऊन अफाट जिद्द व कष्टाच्या जोरावर बांधकाम क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाची कमान कायम उंंच ठेवणारे, डोंगरप्रवण भागातून शहरात आलेले यशस्वी युवा उद्योजक एएनएस कन्स्ट्रक्शन (ANS Construction) या कंपनीचे सर्वेसर्वा श्री. अरूण नारायण सूर्यवंशी यांचा उद्योजकीय प्रवास या लेखातून जाणून घेणार आहोत.
कडेगाव तालुक्यातील चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या कोतवडे या गावात श्री. अरुण नारायण सूर्यवंशी यांचा जन्म 10 जानेवारी 1991 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला त्याकाळी पाण्याची टंचाई असल्याने शेतीही फारशी पिकत नसायची, त्यामुळे मिळेल ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह केला जायचा, अशा परिस्थितीत अरुण सूर्यवंशी हे गावातच जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षणाचे धडे घेऊ लागले, पुढे माध्यमिक शिक्षण व ज्युनिअर कॉलेज हे शेजारच्या गावात झाले व पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी कराडची वाट धरली, कराड येथील नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग साठी प्रवेश घेतला, कराड सारख्या शहरात राहून शिक्षण घेणे परवडत नव्हते, इंजिनीरिंगचा खर्च तसेच खोली भाडे व खानावळीचे पैसे यामुळे कुटुंबाची होणारी ओढाताण श्री.सूर्यवंशी यांच्या लक्षात येताच त्यांनी बांधकामाच्या साईटवर सेंट्रींग कामगार म्हणून जायला सुरुवात केली व त्या कामातून अनुभव वाढू लागला, पुढे सुपरवायझर म्हणून तिथे काम करू लागले काही वर्षे सरली इंजिनिअरिंग पूर्ण झाले, ज्युनिअर इंजिनियर म्हणून ते एका कंपनीत नोकरी करू लागले,पण त्यांना काही नोकरीमध्ये समाधान मिळत नव्हते,काहीतरी करून दाखवण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती, त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला,अगदी धाडसाने कुठलेही पाठबळ पाठीशी नसताना 2014 साली त्यांनी ANS Construction कंपनीची सुरुवात केली.
'मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके हौसलों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौंसलों से ही उड़ान होती है।,'
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे तरुणांनी मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत व ती साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
एएनएस कंस्ट्रक्शन ची सुरुवात केल्यानंतर व्यवसाय नवीन असल्यामुळे अनेक अडचणी-खाचखळगे आले पण ध्येय निश्चित असल्यामुळे वाटचाल ठाम होती, सुरुवातीच्या काळात नवीन कामे मिळत नव्हती पण चिकाटी व संयम ठेवत जी कामे होती त्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन होत गेला ऐक-ऐक करीत आपल्या कल्पक दृष्टीतून देखण्या इमारती आकाराला येऊ लागल्या. लोकांमध्ये मिसळण्याची,कामगारांना जपण्याची,त्यांच्याशी आपलेपणाने वागण्याची सवय असल्याने कामा मधूनच कामे मिळत गेली व हळूहळू एएनएस कन्स्ट्रक्शन (ANS Construction) या नावाचा कडेगाव तालुक्यात ब्रँड होऊ लागला.बांधकाम क्षेत्रात रमणारे श्री. सूर्यवंशी हे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत, शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, मुलांना दत्तक घेणे, भारतमातेची सेवा बजावत असलेल्या सैनिकांना ना नफा ना तोटा या तत्वावर घर बांधून देणे, लाॅकडाउन काळात कामगारांना किराणा साहित्य वाटप अशी सामाजिक कामे ते सातत्याने करीत असतात या सामाजिक कार्याची दखल घेऊन रक्षक फाउंडेशनचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
...आणि स्वप्न साकार होतयआज स्वतःबरोबरच समाजालाही अभिमान वाटावा असे कौतुकास्पद कार्य करणाऱ्या एएनएस कन्स्ट्रक्शन ग्रुपचा ''ANS Pride'' नावाने कडेगाव येथे भव्य प्रोजेक्ट उभा राहतोय, गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या किंमतीत घराचे स्वप्न साकार होणार आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही उपलब्ध होत आहे.
0 टिप्पण्या