तथागत फाऊंडेशन यांच्या माध्यमातून शिवाजीनगर येथे 8 सप्टेंबर हा "जागतिक साक्षरता दिन" साजरा करण्यात आला यावेळी प्रथम महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अविनाश कांबळे साहेब यानी केले.
तथागत फाऊंडेशन चे अध्यक्ष रोहीत गुजर यांनी प्रास्ताविक केले की बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येक भाकीत खर ठरत आहे. बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला आहे त्या मध्ये प्रथम शिका हे ठणकावून सांगितलं आहे . त्याचं बरोबर संस्थेच्या माध्यमातून आपण भविष्यात गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण त्याचं बरोबर शासनाच्या योजना, शिष्यावृती इत्यादींची माहिती पोहोचवणार आहोत.
अविनाश कांबळे यांनी मनोगातात म्हंटले की साक्षर होण ही आजची गरज आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक विचार आपल्याला शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आहेत.
या कार्यक्रमासाठी सागर कांबळे, आकाश भिसे, आबासो वायदंडे, विशाल झेंडे सुरेंद्र भंडारे, सूरज वायदंडे, रोहीत गुजर, अविनाश कांबळे साहेब, साधना भंडारे , सौरभ कांबळे आदि मान्यवर उस्थितीत होते शेवटी आकाश भिसे यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या