सांगली प्रतिनिधी : मटका व्यवसायासाठी दिलेल्या पैशाचे व्याज आणि मुद्दल रक्कम परत न दिल्यामुळे खाजगी सावकारी करणाऱ्या टोळीने सांगलीतील कडेगांव येथील तीन युवकांवर लोखंडी रॉड, तलवार व गुन्हे गंभीर जखमी करत बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी खाजगी सावकार सुधीर प्रकाश फडतरे, शुभम जितेंद्र यादव, शुभम सुहास यादव, रा. कडेपूर राहुल मोहन चन्ने रा.कडेगांव राम उर्फ आशुतोष मदने, सुरज मोहिते रा. हिंगणगाव खुर्द या 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ही घटना सोमवार दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 2 च्या सुमारास कडेगाव शहरातील कराड विटा महामार्गालगत 8 जुलै रोजी दुपारी 2 वाजता घडली. यावेळी अरबाज अस्लम तांबोळी यांचे वडील अस्लम तांबोळी यांना कडेपूर येथील खाजगी सावकार व मटका व्यावसायिक सुधीर फडतरे यांनी स्वत:चा मटका व्यवसाय चालवण्यासाठी एक लाख रूपये दिले होते. अस्लम तांबोळी यांनी मटक्याचा धंदा बंद केल्या नंतर मटक्या व्यवसायातील 90 हजार देणे बाकी होते. त्या मुद्दलीचे मासिक व्याज अस्लम तांबोळी हे प्रत्येक महिन्याला देत होते. दोन ते तीन महिन्याचे व्याज न दिल्यामुळे खाजगी सावकार सुधीर फडतरे यांनी आपल्या साथीदारांसह अरबाज तांबोळी याला सोमावरी कडेगाव येथील स्टँड चौकामध्ये मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी अरबाज तांबोळी व असलम तांबोळी हे पोलीस स्टेशनमध्ये गेले असता आरबाज याचा लहान भाऊ कराड विटा रोडवरील साई हाॅटेल समोर आपल्या मित्रांसोबत बसला होता. तुझ्या वडिलांना व भावाला माझ्या विरोधात खाजगी सावकारी व मटक्याची तक्रार मागे घ्यायला सांग नाही तर त्यांना सोडणार नाही अशी धमकी दिली.
आरबाज त्यांची समजूत काढत असताना सुधीर फडतरे याच्या थार गाडीतील ठेवलेल्या तलवार, गुप्ती, व लोखंडी रॉडने सुधीर फडतरे याचे साथीदार राहुल याने तलवारीने सोहेल मोहीद्दीन मुल्ला याचे उजव्या हाताचे पोटरीवर मारून जखमी केले व जय उर्फ बबलु शिवाजी पवार याच्या डावे हाताचे कोपराजवळ अशुतोष मदने याने गुप्तीने मारून जखमी केले, विजय शुभम यादव याने लोखंडी रॉडने निहाल अस्लम तांबोळी याचे पाठीवर मारुन जखमी केले तसेच सुधीर फडतरे याने शुभम यादव याचे कडुन लोखंडी रॉड घेवुन निहाल याचे बरगडी व मांडी वर मारहाण कऊन गंभीर जखमी केले तसेच जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेशाचे उलंघन केले आहे.
याप्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या