Ticker

6/recent/ticker-posts

बिग बाॅसच्या घरात वाइल्ड कार्ड प्रवेश करणारा,संग्राम चौगुले कोण आहे?

 

Big boss marathi wild card entry sangram chaugule
Bigg Boss Marathi Season 5 Sangram Chougule : यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) आता सातवा आठवडा सुरू झाला आहे. या सातव्या आठवड्यात आता घरात नवा ट्विस्ट पहायला मिळणार आहे, घरात नवा सदस्य येणार आहे. शरीराने धष्टपुष्ट असलेला,कोल्हापूरचा रांगडा पैलवान गडी, Mr.Universe, सहा वेळा 'मिस्टर इंडिया', पाच वेळा 'महाराष्ट्र श्री' चा मानकरी ठरलेला संग्राम चौगुले (Sangram Chougule) याची बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. 'भाऊचा धक्का'वर शोचा होस्ट रितेश देशमुखने संग्रामचे स्वागत केले.

संग्राम चौगुलेच्या wild card Entry ने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत, तर घरात प्रवेश करताच संग्राम चौगुलेने नडायला सुरुवात केली आहे,त्याला बिगबाॅस ने दिलेल्या टास्कमध्ये अरबाज व निक्की यांना पाण्यात ढकलून थेट पंगा घेतलाय, तर निक्कीने हा लवकरच घराबाहेर जाईल हे चॅलेंज दिलं.

त्यामुळे आता घरातील समीकरणात काय बदल होतील, याकडेही प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या आहेत.

Sangram Chougule bb marathi 5


कोण आहे संग्राम चौगुले?

मुळचा कोल्हापूरचा असलेल्या संग्राम चौगुले हा शरीरसौष्ठवपटू असून सध्या पुण्यात स्थायिक आहे. संग्राम हा सहा वेळा 'मिस्टर इंडिया' तर 2012 आणि 2014 या असे दोन वेळा 'मिस्टर युनिव्हर्स' होण्याचा मान संग्रामने मिळवला होता. संग्रामने अभिनयाच्या क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं आहे. संग्राम हा 2016 साली मराठी रुपेरी पडद्यावर 'दंभ' या चित्रपटातून झळकला होता. त्यानंतर त्याने 'आला माझ्या राशीला' मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. 

संग्रामचे इन्स्टाग्रामवर 1.5 मिलियन्स फॉलोअर्स असून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवरही त्याचे चाहते आहेत. सोशल मीडियावर संग्रामचे वर्कआउट करतानाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात