राष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी या दिवशी "ड्राय डे" घोषित करावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना पक्षाचे प्रवक्ते व मराठा वनवास यात्रेचे संयोजक श्री योगेश केदार यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे केले.
राष्ट्राचे आराध्यदैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, त्याच्या कार्यकर्तृत्वाने कायमच राष्ट्राला प्रेरणा मिळाली आहे, अशा महापुरुषांचा जन्म महाराष्ट्रभूमीत झाला, त्यांच्या प्रेरणेने सुसंस्कृत तरुण पिढी घडली आहे, अशा प्रेरणादायी शिवजयंती दिवशी "ड्रायडे"(दारु बंद) Dry Day असावा अशी तमाम शिवभक्तांची भावना आहे,अनेक संस्था व संघटना अशी मागणी करत आहेत, बार्शी येथील जय शिवराय प्रतिष्ठान हे नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असते,त्यांनी देखील त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्यात अशी मागणी केली होती, याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे प्रवक्ते व मराठा वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अशा मागणीचे निवेदन दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले निवेदन |
0 टिप्पण्या