Ticker

6/recent/ticker-posts

कडेगाव तालुका मनसेचा कृषी विभागाला इशारा: ४.५ कोटीचे अनुदान न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार

 

कडेगाव तालुका मनसेचा कृषी विभागाला इशारा: ४.५ कोटीचे अनुदान न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार

कडेगांव - सांगली जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने हजारो शेतकऱ्यांचे फार्म ठिबक सिंचन अनुदान मिळवण्यासाठी भरून घेतले गेले आहेत. मात्र साल २०२३/२४ चे हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रूपये अनुदान केंद्र व राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांपासून दिलं नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कडेगावं तालुका मनसेच्या वतीने कडेगावं कृषी विभागास दोन वर्षांपासून प्रलंबित अनुदान त्वरित देण्यासाठी निवेदन देण्यात आले. याबाबत निर्णय न घेतल्यास व शेतकऱ्यांच्या विविध योजनेचे प्रलंबित अनुदान न मिळाल्यास. शेतकऱ्यांना सोबत घेऊन ४ आक्टोंबर रोजी कडेगांव कृषी विभागास टाळे ठोकणार असल्याचा इशारा मनसेने निवेदनात दिला आहे‌. निवेदनात म्हटले आहे की, गेली दीड - दोन वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेचे अनुदान मिळावे यासाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र कडेगांव तालुक्यातील तब्बल ८२३ शेतकऱ्यांचे २ कोटी ७७ लाख २० हजार रुपये केंद्र सरकारने दोन वर्षांपासून थकवले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने देखील ९५९ शेतकऱ्यांचे १ कोटी ६४ लाख ७८ हजार रुपये अनुदान अद्याप दिलं नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे ही सदरची योजना सरकारने बंद केली आहे काय ? असा सवाल मनसेनं विचारला आहे. तसेच हे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून फसवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सदर सर्व शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान जमा करावे आणि शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी. अन्यथा असे न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन 4 आक्टोंबर रोजी कडेगांव कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा मनसेचे अध्यक्ष विशाल शिंदे यांनी दिला आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, उपाध्यक्ष सतीश येताळ, संदीप मोहिते,अजय शिंदे उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात