महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 :
Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana Update |
सांगली, दि. 10 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतू आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दि. 12 ऑगस्ट 2024 ते दि. 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. ही मुदत दि. 18 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.
संबंधीत शेतकऱ्यांनी मुदतीत आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा लघुसंदेश महा-आयटी मार्फत देण्यात आलेला आहे. मुदतीमध्ये पात्र यादीमधील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे. आधार प्रमाणिकरण न केल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील एकूण 87 हजार 859 लाभार्थ्यांची यादी शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली होती. त्यापैकी 87 हजार 407 इतक्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. त्यापैकी 80 हजार 337 इतक्या खात्यांवर 294 कोटी 7 लाख रूपये इतकी लाभाची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. अद्याप जिल्ह्यामध्ये 452 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक असल्याचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
0 टिप्पण्या