जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर 16 सप्टेंबर च्या मध्यरात्री 12 वाजेपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेतून केली, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना ळपासून मराठ्यांना ओबीसीत स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीसाठी ते अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करीत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.
जरांगे पाटील म्हणाले की "आमच्या मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा यासाठी उपोषण करत आहे, मराठा समाजाची मुले मोठी झाली पाहिजे यासाठी मी 17 तारखेपासून म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा उपोषणाला बसणार आहे, कोणीही आपले कामे सोडून आंतरवालीकडे येऊ नये, मी 16 तारखेला रात्री 12 वाजल्यापासून उपोषणाला बसणार आहे" असं जरांगे पाटील म्हणाले आहेत
जरांगे पाटील पुढे म्हणाले की "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, ते धाडसी आहेत त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे परंतु त्यांनी एक वर्ष आम्हाला वाट पहायला लावले आहे, त्यांनी आमचा एवढा अंत पाहू नये, ईडब्ल्यूएस (EWS) मधील मुले बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्याचबरोबर सगेसोयरे अंमलबजावणी झाली पाहिजे यावरदेखिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष दिले पाहिजे" तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे ते म्हणाले की "मराठा समाजाला माहीत आहे की नेमका माज कोणाला आला आहे, मग तो देवेंद्र फडणवीस यांना आला आहे का मला आला आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण द्या विषय संपला, तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका मग तुम्हाला कळेल मराठ्यांचा कचका कसा असतो ते अनेक जणांकडून फोडाफोडी सुरू आहे तुम्ही मराठा आरक्षण द्या ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, तुम्ही आरक्षण द्या त्याचा फायदा तुम्हाला होईल" अस जरांगे पाटील म्हणाले.
0 टिप्पण्या