Ticker

6/recent/ticker-posts

स्व.पतंगराव कदम यांच्या "लोकतीर्थ" स्मारक लोकार्पण सोहळा

Patangrao Kadam Loktirth

राज्याचे ज्येष्ठ नेते पलूस-कडेगावसह सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते टेंभू,ताकारी योजनेचे शिल्पकार स्वर्गीय डॉ.पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा व "लोकतीर्थ" या स्मारकाचा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देशाचे माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, राज्यातील पक्षाचे नेते,पदाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व प्रचंड जनसागराच्या साक्षीने संपन्न होणार आहे. 

स्व.डॉ. पतंगराव कदम म्हणजे राज्याच्या राजकारणातील एक झंजावाती असे व्यक्तिमत्त्व, राजकारण विरहित समाजकारण करण्याऱ्या या नेत्याचा जीवनप्रवाह 9 मार्च 2018 रोजी थांबला परंतु साहेबांनी आपल्या राजकीय व सार्वजनिक जीवनात जे महाकाय असे कार्य उभे केले त्यामधून साहेब प्रत्येकाच्या मनात निरंतरपणे बसले आहेत, साहेबांच्या आठवणी या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीत बसल्या आहेत, साहेबांनी हा परिसर उभा करण्याचे काम अखंडपणे आयुष्यभर केले त्यामुळेच अखंड महाराष्ट्रात व देशभरात हा परिसर समृद्ध व वैभवशाली बनला आहे, स्वर्गीय साहेबांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, या येणाऱ्या पिढीला साहेबांच्या या प्रवासातून प्रेरणा व स्फूर्ती यावी यासाठी माजी आमदार मोहनराव कदम, आ.डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह कदम कुटुंबीय तसेच पलूस कडेगाव च्या कार्यकर्त्यांनी साहेबांचे भव्यदिव्य स्मारक उभे केले त्या ठिकाणी साहेबांच्या 18 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे,  प्रवेशद्वारावर सुंदर व भव्य अशी स्वागत कमान उभारण्यात आली आहे अतिशय सुरेख रस्ते,दुतर्फा सुंदर व आकर्षक हिरवळ झाडे यामुळे मन प्रफुल्लित होत आहे, समोरच श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री तुळजाभवानी, श्री गणेश मंदिर उभारण्यात आले आहे या तीनही मंदिरावर कोरीव,आकर्षक नक्षीकाम केले आहे,  त्याचबरोबर या ठिकाणी साहेबांचा जीवनपट देखील उभारण्यात आलेला आहे शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्व.पतंगराव कदम साहेब यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात