Ticker

6/recent/ticker-posts

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगली व मिरज शहरात वाहनांसाठी मनाई आदेश जारी

 

Sangli Miraj Ganpati festival

  सांगली : सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. 7 ते 17 सप्टेंबर 2024 अखेर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी सांगली व मिरज शहरामध्ये बहुसंख्य लहान मुले, स्त्रिया, पुरूष गर्दी करीत असतात. यावेळी कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरीकांच्या जिवितास धोका पोहचू नये याकरीता सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये सांगली व मिरज शहरातील विविध मार्गावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी वापरण्यात येणारी वाहने, पोलीस वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिग्रेड, महानगरपालिकेची स्वच्छता करणारी वाहने या वाहनांखेरीज सर्व वाहनांना सांगली व मिरज शहरामध्ये खालीलप्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे.

 सांगली शहर - मनाई आदेश लागू करण्यात आलेले दिवस व कंसात कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 11 सप्टेंबर (5 वा दिवस विसर्जन), 13 सप्टेंबर (7 वा दिवस विसर्जन), 15 सप्टेंबर (9 वा दिवस विजर्जन), 17 सप्टेंबर (अनंत चर्तुदशी विसर्जन). या दिवशी 14.00 ते रात्री 23.59 या वेळेत मनाई आदेश लागू केला आहे.


गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग  

  (1) विश्रामबाग चौकाकडून येणाऱ्या गणेशमंडळाच्या मिरवणुका - विश्रामबाग - पुष्पराज चौक - राममंदीर - काँग्रेस भवन - कामगार भवन - स्टेशन चौक - राजवाडा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती पेठ - टिळक चौक - कृष्णा घाट.

 (2) कुपवाड यशवंतनगर कडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका - भारत सुतगिरणी चौक-कुपवाड रोड - लक्ष्मीनगर चौक - कुपवाड फाटा - नविन ओव्हर बीज - विश्रामबाग चौक - पुष्पराज चौक – राममंदीर - काँग्रेस भवन - कामगार भवन - स्टेशन चौक - राजवाडा चौक - पटेल चौक – तानाजी चौक - गणपती पेठ - टिळक चौक - कृष्णा घाट.

 (3) रिसाला रोड कडून येणाऱ्या गणेश मंडळाच्या मिरवणूका - रिसाला रोड - शिवाजी पुतळा - मारुती चौक - गारमेंट सेंटर चौक - बालाजी चौक येथून वेगवेगळे मार्ग.

 (अ) बालाजी चौक - करमरकर चौक - राजवाडा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदीर - टिळक चौक - कृष्णा घाट.

 (ब) बालाजी चौक - झांशी चौक - गणपती मंदीर - टिळक चौक - कृष्णा घाट.


 (4) टिंबर एरिया कडून येणाऱ्या गणेश मंडळांच्या मिरवणूका - कॉलेज कॉर्नर - सांगली हायस्कूल महाराजा चौक - पटेल चौक - तानाजी चौक - गणपती मंदीर - टिळक चौक - कृष्णा घाट.

(5) गणपती विसर्जन झालेल्या मंडळांचा परतीचा मार्ग - टिळक चौक – हरभट रोड - गारमेंट सेंटर चौक मार्गे. 


प्रवेश बंद ठिकाणे (बॅरिगेटींग) दुपारी 14.00 नंतर

 (अ) वाहतूक नियंत्रण शाखा सांगली कडून (लोखंडी) - टिळक चौक - गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, जोग ज्वेलर्स - सराफ कट्ट्याकडे जाणारा रस्ता, गारमेंट सेंटर - मारूती चौकाकडे जाणारा रस्ता, बालाजी चौकाकडे जाणारा रस्ता, मैत्रिण कॉर्नर - करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, सांगली शहर पोलीस ठाणे - करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, राजवाडा चौक - पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक - टेलीफोन ऑफिसकडे जाणारा रस्ता, जुना बुधगाव रोड - बायपासकडून वखारभागाकडे जाणारा रस्ता, जामवाडी कॉर्नर - पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी - तानाजी चौकाकडे जाणारा रस्ता, गवळी गल्ली - झांशी चौकाकडे जाणारा रस्ता, मगरमच्छ कॉलनी (क्रॉस रोड) - सराफ कट्ट्याकडे जाणारा रस्ता, वसंतदादा समाधी स्थळ (क्रॉस रोड) - गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, नवसंदेश कार्यालय - आनंद टॉकीकडे जाणारा रस्ता, कामगार भवन - आमराईकडे जाणारा रस्ता.

 (ब) महानगरपालिकेतर्फे (लाकडी/बांबूचे) बॅरेगेटींग - देशपांडे बिल्डींग (वखारभाग) - पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, अंबाभुवन वखारभाग ते गवळी गल्लीकडून हायस्कूल रोड व गणपती पेठेस मिळणारे सर्व रस्ते.

 (क) पर्यायी वाहतूक मार्ग - मिरजकडून येणाऱ्या व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील). इस्लामपूरकडून येणाऱ्या व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी - इस्लामपूर टोलनाका - बायपास - कॉलेज कॉर्नर - आपटा चौकी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील). तासगाव, विटा कडून सांगलीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी - संपत चौक - औद्योगिक वसाहत - संजयनगर - 100 फुटी रोड - अहिल्यादेवी होळकर चौकातून शिंदे मळा किंवा मंगळवार बाजार मार्गे सह्याद्रीनगर ब्रिजवरून सांगली शहरात येता जाता येईल. तसेच शिंदे मळा - जुना बालाजी मिल रोड किंवा टिंबर एरीया - कॉलेज कॉर्नर - आपटा चौकी - पुष्पराज चौक - सिव्हील हॉस्पीटल - झुलेलाल चौक - पत्रकार नगर कॉर्नर - आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोडकडे किंवा सांगली शहरात येता व जात येईल. कर्नाळ पलूसकडून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी - कर्नाळ रोड - शिवसंभो चौक - बायपास रोड - जुना बुधगाव टोल नाका चौक - पट्टणशेटी होंडा शोरूम कॉर्नर - कॉलेज कॉर्नर चौक - आपटा पोलीस चौकी - पुष्पराज चौक किंवा काँग्रेस भवन - राममंदिर चौक - सिव्हील हॉस्पीटल चौक - सिव्हील रोड - झुलेलाल चौक मार्गे सांगली शहरात येता व जाता येईल.

  गणेशोत्सव कालावधीतील पार्किंगची ठिकाणे - जनावर बाजार (टिळक चौक) - इस्लामपूर व सांगलीवाडी कडून येणाऱ्या वाहनांसाठी. जुनी जयश्री टॉकीजच्या मागे (हरभट रोड) - चारचाकी वाहनांसाठी. शिवनेरी हॉटेलच्या मागे (भावे नाट्यगृहालगत) - दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी. वैरण बाजार (तरूण भारत स्टेडीयम समोर) - कोल्हापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी. राजवाडा पटांगण - पलूस - नांद्रेकडून येणाऱ्या वाहनांसाठी. कोर्ट आवार - दुचाकी वाहनांसाठी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम - तासगाव - मिरजकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पीटल तासगाव कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम - दुचाकी पार्किंगसाठी. सांगली हायस्कूल आमराई जवळ - टिंबर एरियाकडून येणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी. कर्नाळ पोलीस चौकीचे मागील पटांगण (जामवाडी) - कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. पटेल चौक क्रिडा मंडळ कर्नाळकडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी. 


 मिरज शहर - मनाई आदेश लागू करण्यात येणारे दिवस व वेळ – दि. 16 ते 18 सप्टेंबर 2024 (अनंत चतुर्दशी विसर्जन) दि. 16 सप्टेंबर चे 10.00 वाजल्यापासून ते दि. 18 सप्टेंबर चे 16.00 वाजेपर्यंत.

 मनाई आदेश लागू करण्यात येणारी ठिकाणे व रोड - श्रीकांत चौक – श्रीकांत चौकात येणारे रस्ते, स्टेशन चौक – मिरासो दर्ग्याकडे जाणारा रस्ता, हिरा हॉटेल - मिरज शहर पो. ठाणेकडे जाणारा रस्ता, फुलारी कॉर्नर - फुलारी कॉर्नरकडे येणारे सर्व रस्ते, बॉम्बे बेकरी - बॉम्बे बेकरीकडे येणारे सर्व रस्ते, किसान चौक - श्रीकांत चौक व पोलीस ठाणे कडे जाणारा रस्ता, दत्त चौक - श्रीकांत चौकाकडे जाणारा रस्ता, जवाहर चौक - किसान चौकाकडे जाणारा रस्ता, भोसले चौक - पाटील हौदाकडून भोसले चौकाकडे जाणारा रस्ता, झारी मस्जिद कॉर्नर – बॉम्बे बेकरीकडे जाणारा रस्ता, श्रीकांत चौक ते गणेश तलाव या मार्गावर येणारे सर्व रस्ते.


 पर्यायी माहतूक मार्ग - तासगांव फाटा कडून येणारी सांगली कोल्हापूकडे जाणारी वाहने – तासगाव फाटा – गांधी चौक –विश्रामबाग मार्गे सांगली व कोल्हापूर (परतीचा मार्ग हाच राहील.). मालगांव, टाकळी बोलवाड, कडून सांगलीकडे जाणारी वाहने – दिंडी वेस – आळतेकर हॉल, ओ-2 पार्क, कर्मवीर चौक - गांधी चौक मार्गे सांगली (परतीचा मार्ग हाच राहील.). मालगांव, टाकळी बोलवाड कडून कोल्हापूरकडे जाणारी वाहने – दिंडी वेस – गाडवे चौक – मंडले पेट्रोल पंप – शास्त्री चौक - फुले चौक -कोल्हापूर ब्रिज मार्ग कोल्हापूर (परतीचा मार्ग हाच राहील.). म्हैशाळ, बेडग कडून सांगली व कोल्हापूकडे जाणारी वाहने – जुना नाका – शास्त्री चौक – फुले चौक – कोल्हापूर ब्रीज मार्ग सांगली व कोल्हापूर (परतीचा मार्ग हाच राहील.). एमआयडीसी, मिरज कडून कोल्हापूरकडे जाणारी वाहने - अल्फोन्सा स्कूल – रवा मैदा फॅक्टरी, विजयनगर – कोल्हापूर (परतीचा मार्ग हाच राहील). एमआयडीसी, मिरज कडून कर्नाटक राज्यात जाणेसाठी – मेनन पिस्टन चौक – तानंग फाटा – तासगाव फाटा – सुभाषनगर मार्गे कर्नाटक राज्य (परतीचा मार्ग हाच राहील).


 गणेशात्सव कालावधीतील पार्किंगचे ठिकाण – शिवाजी क्रिडांगण - कोल्हापूर, सांगली कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, न्यू इंग्लीश स्कूल - कवठेमहंकाळ, मालगांव कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, मिरज हायस्कूल - आरग, बेडग कडून येणा-या सर्व वाहनांसाठी, महात्मा फुले चौक – कर्नाटक म्हैसाळ कडून येणाऱ्या सर्व वाहनांसाठी, साठे पुतळ्याचे पाठिमागील बाजूस – वाहनांची गर्दी झाल्यास पर्यायी पार्किंग व्यवस्था. 

 या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात