Ticker

6/recent/ticker-posts

मनसेची गांधीगिरी;आधी निवेदने दिली,मग घेतला हातात खराटा

MNS Kadegaon Taluka

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुक्याच्या वतीने आगार व्यवस्थापक( डेपो मॅनेजर) विटा तसेच सांगलीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनातून कडेगाव तालुक्यातील वांगी गावातील बसस्थानक मागील 10 वर्षापासून बंंद असून मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेला आहे व परिसर अस्वच्छ आहे,भटक्या कुत्र्यांचा वावर असतो तसेच स्थानक परिसरात आत एसटी उभी करण्यासाठी जागा असून देखील एसटी आत घातली जात नाही,त्याठिकाणी दारुड्याचा अड्डा बनला आहे, परिसर अस्वच्छ झाला आहे त्यामुळे नागरीक व विद्यार्थ्यांची गैरसोय होते आहे,स्वच्छतागृहाची सोय नसल्याने महिला वर्गाला समस्यांना तोंड द्यावे लागते यासंबंधी वारंवार निवेदनातून सांगून सदरचे बस स्टॅन्ड डागडुजी करून परिसर स्वच्छ व्हावा व गाड्या स्थानकात ये-जा व्हाव्यात यांसाठी निवेदन देऊन देखील आज अखेर कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचा निषेध करत शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी मनसे कडेगाव तालुकाध्यक्ष श्री. विशाल शिंदे यांचे नेतृत्वात वांगी गावातील बसस्थानक सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी महिला महाराष्ट्र सैनिक यांनी स्वतः हातात खराटा,झाडू घेवून तसेेच परिसर पाण्याने धुवून काढला.

    यावेेेळी कडेगाव तालुका अध्यक्ष श्री विशाल शिंदे, तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ, वांगी विभाग अध्यक्ष अजय शिंदे, वांगी शाखाध्यक्ष संदीप मोहिते, बेलवडे शाखाध्यक्ष विशाल तवर, महिला कोतवडे शाखाध्यक्ष राधिकाताई सूर्यवंशी महाराष्ट्र सैनिक निशिगंधा शिंदे, नीलम मोहिते, अनिता मोहिते,महाराष्ट्र सैनिक विराज शिंदे, अमर शिंदे, श्रीराम मोहिते, रोहित मोहिते इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात