Ticker

6/recent/ticker-posts

पलूस कडेगाव विधानसभेला तिरंगी लढतीची शक्यता

 

Palus-Kadegaon possibility of three-way fight

सांगली : माजी राज्यमंत्री आणि पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असणारे डाॅ.विश्वजीत कदम यांच्याविरोधात भाजपकडून माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणारे संग्रामसिंह देशमुख  यांना उतरुन तगड आव्हान कदमांना दिले जाणार आहे,त्याचबरोबर क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे शरद लाड हेही निवडणूक लढण्यास इच्छुक दिसून येत आहे,त्यामुळे येत्या विधानसभेला मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.

          माजी मंत्री असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डाॅ.पतंगराव कदम आणि कडेपूरच्या देशमुख कुटुंबातील पारंपारिक संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे आता नव्या पिढीतील डाॅ.विश्वजीत कदम आणि संग्रामसिंह देशमुख हेही एकमेकांसमोर आव्हान देत आहेत.

        डाॅ.पतंगराव कदमांच्या निधनानंतर रिक्त जागेवर लढण्यास भाजपकडून संग्रामसिंह देशमुख इच्छुक होते मात्र त्यांना थांबवून विश्वजीत कदमांना बिनविरोध निवडण्यात आले,2019 ला देखील ऐनवेळेस मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला परिणामी देशमुखांना थांबावे लागले आणि विश्वजीत कदम हे राज्यात उच्चांकी मतांनी निवडून आले.

मतदारसंघात इर्षेने निवडणूक झालेली नाही,कार्यकर्ते व मतदारांमध्ये चैतन्य आणण्यासाठी व गट शाबूत ठेवण्यासाठी निवडणूक लढणे गरजेच असते त्यामुळे देशमुखांनी कोणत्याही परिस्थितीत आता लढणारच असा चंग बांधला आहे.

शरद लाड लढणार 

क्रांती उद्योग व शिक्षण समूहाचे शरद लाड यांनीही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी,गावदौरा बैठका चालू आहेत,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांचे ते सुपुत्र असून तेही राष्ट्रवादी शप गटात कार्यरत आहेत त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार आणि त्यांचा नेमका कोणाला फायदा होणार याचे अंदाज बांधले जात आहेत. 

      लाड गटाची ताकद पूर्वी देशमुखांसोबत होती नंतर देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लाड राष्ट्रवादीत राहिले त्यामुळे ते काँग्रेस  आणि कदमांसोबत त्यांची ताकद असायची.

त्यामुळे कोणाचे पारडे येत्या निवडणुकीत जड जाईल आणि निवडणूक दुरंगी होईल का तिरंगी हे विधानसभेत कळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code

येथे करा आपल्या व्यवसायाची जाहिरात