वांगी ग्रामपंचायतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
वांगी (ता. कडेगाव) - गावातील सुरक्षेसाठी तसेच प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वांगी ग्रामपंचायतीस निवेदन देण्यात आले. बाहेरून मजुरीसाठी येणाऱ्या परराज्य व परगावातील नागरिकांची नोंदणी करून त्यांचे ओळखपत्र तपासण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
निवेदनात मुख्यतः पुढील तीन मागण्या मांडण्यात आल्या आहेत:
1. गावात बाहेरून येणाऱ्या कामगार व मजुरांची नोंदणी करून त्यांची माहिती ग्रामपंचायतीकडे असावी.
2. मेन रोडवरील खराब झालेल्या स्ट्रीट लाईट्स त्वरित सुरू करण्यात याव्यात.
3. जिल्हा परिषद शाळेसमोरील परिसरात तंबाखू व गुटख्याच्या विक्रीवर त्वरित बंदी आणावी.
या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास १० मार्च रोजी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर मनसेचे कडेगाव तालुका अध्यक्ष विशाल संजय शिंदे यांची स्वाक्षरी असून, ग्रामपंचायतीने यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या